Wednesday, July 7, 2010

चांग भलं!

भैरोबाच्या नावाने चंग भलं! जोतिबाच्या नावाने चंग भलं! उदे ग अंबे उदे!
मी प्रवीण पाटील रा. नेर्ली ता. करवीर जि. कोल्हापूर. आमच्या ३ ग्राम देवतांना अभिवादन करून ब्लॉग ची सुरवात करतो. कोल्हापूर आणि आस पासच्या परिसरात "आधी वंदू तुज मोरया" ची जागा "उदे अंबे उदे!" दिली गेली आहे.
प्रत्येक गावाला स्वताचा इतिहास भूगोल असतो. आमच्या गावाला सुद्धा आहे. गाव सोडून आज १० वर्षे झाली. त्या निमित्ताने त्या इतिहासाची, भूगोलाची आठवण येत आहे. म्हणून हा ब्लॉग लिहायचा प्रपंच.
या पहिल्या पोस्त मध्ये माझ्या गावाविषयी थोडीशी कल्पना द्यावी हा विचार.
सात-आठ हजार लोकवस्तीचे आमचे गाव. गावात प्रामुख्याने पाटलांची वस्ती. अंदाजे ३०%. त्यातला मी एक पाटील. तसे गावात १२ बलुतेदारी मध्ये समावेश असणारया सर्व जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत. अलीकडच्या काळात गावात यु पी/बिहारी लोकांची वस्ती वाढत आहे. कारण आहे गावाला वेढलेल्या ३ MIDCs. असो. त्या विषयाला हात घालण्याचे प्रयोजन नाही. राज ठाकरे साहेबांचे ते राखीव कुरण आहे. तिकडे आमच्यासारख्याने चरून चालणार नाही. असो.
उदार निरावाहासाठी शेती हा मुख्य आधार. उसाचे पीक प्रामुख्याने. ९०% लोक लहान शेतकरी. जास्तीत जास्त ३-४ एकर जमीन असणारे. शेती शिवाय गावाला MIDC च्या रूपाने चांगला income सौर्चे लाभला आहे. गावची बरीचशी तरुण पोरं दहावी/ बारावी पास/नापास झाल्यानंतर जेवणाचा दाबा घेऊन MIDC गाठतात. आमच्यासारखी काही पुढे शिकण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी झाले तर गाव सोडतात, नाहीतर शेती किंवा MIDC.
गावात राजकारण जोरात चालते. सहकारी संस्थांचे पीक जोमाने डोलते आहे. प्रत्येक निवडणूक तितक्याच जोशात लढवली जाते. कधी कधी असे वाटते जर निवडणुका नसत्या तर या गावाचे मनोरंजन कसे झाले असते? तरुण पोरं कामावरून परत आल्यावर आपला वेळ "तरुण मंडळ" नावाच्या गोष्टीत व्यतीत करतात. गावात नाही म्हटले तरी २५-३० तरुण मंडळे असावीत.
गावात एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. सध्या खूप चांगली इमारत झाली आहे तिची. मी लहान असताना हनुमानाच्या देवळात वर्ग भरायचे. एक हाय स्कूल सुद्धा आहे. सांगण्यास आनंद होतो कि ते माझ्या वडिलांनी सुरु केले आहे. माझे वडील पोष्टात काम करत होते. कुटुंबाबद्दल आता पुरते इतकेच.
भैरोबा हा आमचा देव. अंबाबाई आमची देवी. भैरोबाचे मोठे देऊळ आहे गावात. आमदार फंडमधून निधी घेऊन एक मोठा हॉल बांधला आहे. आता गावातील लग्न या हॉल मध्ये होतात. आधी ज्याच्या त्याच्या दारात व्हायची. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आरोग्य केंद्र सुरु झाले आहे काही दिवसांपूर्वी. जिथे मोफत धनुर्वाताचे इंजेक्शन मिळते.
गावात रोगराई कमीच. आज काल डांबरी रस्ते झाले आहेत गावात सुधा. गटारींची, नळाच्या पाण्याची चांगली सोय आहे. लाईट खूप कमी वेळ जाते. फक्त सोमवारी. कारण त्या दिवशी MIDC बंद असते. कोल्हापुरातून केबल टी व्ही चे कनेक्शन आले आहे. आधी TV वर फक्त चित्रहार चालायचा. आता 9XM चालतो.
तर एकूण काय, आमचे गाव तसे काहीसे समृद्ध आणि संतुष्ट आहे. जास्त प्रोब्लेम्स नाहीत. विदर्भ वाल्या गावांसारखे. आत्महत्या तर मुळीच नाहीत. हे सांगण्यात विदर्भाला कमी दाखवायचा हेतू नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आमच्या गावाचे बरे चालले आहे. किमान सकृतदर्शनी!
हा आमच्या गावाचा परिचय. पुढील काही पोस्त मध्ये, आमच्या गावातील काही व्यक्ती, रिती रिवाज, सण-परंपरा याविषयी उहापोह करण्याचा विचार आहे. पाहू कितपत जमते ते.
परत एकदा ... भैरोबाच्या नावाने चंग भलं! जोतिबाच्या नावाने चंग भलं! उदे अंबे उदे!
आणि एवढे लिहून आपली रजा घेतो.
आपला विनम्र,
प्रवीण.

7 comments:

  1. नेर्ली- तामगाव ह्या कोल्हापुरातील ट्विन सीटीज आहेत. तेथे जाण्यासाठी शाहू मैदान येथून बस पकडावी लागते. प्रवास अत्यंत सुखकर आहे.वाटेत शिवाजी विद्यापीठ नावाची शाला आहे...शालेच्या झाडीत बरेच मुल-मुली लपून बसतात.त्याना बस मधून हळूच पाहून घ्यावे.नेर्ली गावच्या काही तरुनानी अटकेपार (अगदी पानिपतच्या पुढे) झेंडा लावला आहे...गावाला त्यांचा अभिमान आहे.
    :-))

    ReplyDelete
  2. Pravin patil..ur writing is really good..keep it up..take some of the comments with a pinch of salt..:-)

    ReplyDelete
  3. Tu Vidarbhatlya gavashi tulana kartos tithech tu Kami lekhtos leka ..
    Btw There is a comic punch .. I liked it ..Keep it up .. :)

    ReplyDelete
  4. स्वागत आहे मित्रा ब्लॉगविश्वामध्ये!
    लिहिता रहा! मस्त!
    येऊ दे अजून!

    ReplyDelete
  5. Shuddhlekhan ganDle ahe bharpur thikaNi... Kadhi kadhi flow disconnected watto... Majhya mate tujhi vichar karNyachi bhasha evdhi "bookish" nasel tar ya vishayavar lihiNyasathi tu thodi faar gavaatli bhasha vaparli asti tar ajun jaast majaa ali asti; tya bhasheli vegLich goDi aste...

    But assuming tujha pahila blog ahe, ati great lihile ahes. It's almost perfect for the first blog. Asech lihit raha. :-)

    ReplyDelete
  6. प्रतिक्रियांबद्दल अनेक धन्यवाद ...
    सोम्या: तुझ्याकडून अशीच कमेंट अपेक्षित होती.. तू एक जिकलेला माणूस आहेस.
    भिवा: तरीही माझा उद्देश कोणालाही कमी लेख्नायचा नव्हता..याच्या पेक्षा जास्त defensive मी होऊ शकत नाही
    भिसे बाबा : अशाच कमेंट पण येत राहू द्यात :)
    सा.का.: शुद्ध लेखना वर लक्ष देईन. लक्षात आणून देत राहा असाच.. "अति ग्रेट" अशी प्रतिक्रिया फक्त तूच देऊ शकतोस..अनेक आभार.. भाषा थोडी बुकीश झाली आहे अलीकडच्या काळात.. मुंबईला आल्यापासून.. सुधारण्याचा प्रयत्न करेन नक्की..

    ReplyDelete
  7. hey there
    blog vishwat swagat aahe:) masta description dile aahes kolhapurche. faar engaging aahe haa account. sorry maaze marathi tuzyasarkhe alankarik nahi aahe:P pan blog regularly update karat raha:)
    aata mee next post wachto
    take care
    ciao

    ReplyDelete