Sunday, July 25, 2010

बसल्या बसल्या-१

-------------------------------------------------------------------------------------------------------
बसल्या बसल्या आपल्याला काही कधी काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला/पाहायला मिळते. मग असलं काही बाकीच्यांबरोबर शेअर करावं असं वाटते. मला पण असंच काहीतरी या पोस्त मध्ये शेअर करायचं आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
"एक क्रांतिकारी संभाषण" 
वेळ: सकाळी ९ वाजता
स्थळ : गेस्ट हौस, बद्दी, हिमाचल प्रदेश.
पात्रे: मी, बलदेव (आमचा ड्रायव्हर), इंदर (आमचा नेपाळी आचारी)

मी चहा-बिस्कीट खात बसलो होतो. (मी पराठे खायचे बंद केले आहेत. वैतागून.) समोर "अमर उजाला" होता.
बलदेव आला. गडबडीत होता. उगाचच. हा साला लेट झाला कि गडबडीत असल्यासारखा दाखवतो.

बलदेव: "सर, कतरिना का व्हीडीओ आया है. देखा क्या आपने?"
'बेटा मन में लड्डू फुटा' अशी अवस्था होउन सुधा, मी मान हलवत नाही म्हटले. कारण एका हातात चहाचा कप अणि दुसर्या हातात बिस्किट होते.
"तुने कहा देखा?" इन्दर ने एंट्री मारली.
बलदेव: "पंजाब केसरी में आया है"
इन्दर: "पंजाब केसरी में व्हीडीओ?"

बलदेव: "अरे मतलब पंजाब केसरी में खबर छपी है. सर, अमर उजाला में आया है क्या?"
मी परत मुंडी हलवली.
बलदेव: "कोई बात नाही सर, आज शाम को ही निकलता हूँ इन्टरनेट से."
कोई बात नाही काय? मी कुठे मागितला बाबा तो व्हिडिओ? हे मनातल्या मनात. २ सेकंदानंतर मला प्रश्न पडला.आयला याला इन्टरनेट माहिती आहे?
बलदेव: "सर ये देखो इसमे से निकाल सकते है." त्याने micromax चा ezeepad मोबाईल खिशातून बाहेर काढला.
मी: "ये कब लिया और इसमे इंटरनेट है?" त्याचा मोबाईल एकदम blackberry सारखा दिसत होता.
बलदेव:"सर कल लेके आया हून. चंडीगड सेक्टर १७ से. साडे चार हजार में. मेरा भाई जानता है कैसे व्हीडीओ निकालना है. कल सुबह आपको मिल जायेगा"
च्यायला परत तेच. मागितला नाही तरीही आपको मिल जायेगा. पण मी ही काही बोललो नाही. मिळाला तर कशाला सोडता.
इंदर: "मुझे भी दे देना". ऑल मेन आर डॉग्ज.

असो. मी चहा बिस्कीट हादडले आणि बलदेवला निघायची खूण केली. अपार्टमेंटच्या पायऱ्या उतरताना एकच गोष्ट मनात रेंगाळत होती. कम्युनिकेशन क्रांती म्हणतात ती हीच का?

3 comments:

  1. खरंच टेलिकॉम क्रांतीपुढे हात टेकले मी पण!
    बाय द वे..व्हिडिओ मलापण मेल केलास तर चालेल...;)

    ReplyDelete
  2. found really interesting...ur writing skill for this post !!!

    ReplyDelete
  3. @भिसे बाबा : अरे अजून मला पण मिळाला नाही. In fact मी स्वतः सर्च केला पण नाही सापडला.
    @सोम्या: चेष्टा का करताय राव. काय चुकले ते सांगा गप गुमान.

    ReplyDelete