मी सध्या "बद्दी" नावाच्या एका गावात राहत आहे. हे गाव हिमाचल प्रदेश मध्ये आहे. लईच वाईट जागा आहे. जाम बोर होत आहे. रोज प्लांट मध्ये येणे, कामगारांवर बोंबा बोंब करणे आणि बॉसला प्रोडक्शन नंबर सांगणे यापलीकडे जिंदगीत काही सुरु नाही. असंच अजून काही दिवस चालू राहिले तर मी ठार वेडा होऊन जाईन. "निगरगट्ट" कामगारांनी लाईफची मारून ठेवली आहे.
अजून एक महाभयानक त्रास म्हणजे नेपाळी जेवण. गेस्ट हौस मध्ये नेपाळी लोक आहेत जेवण आणि बाकीची कामे करायला. एक तर हे साले १५-१५ दिवस अंघोळ करत नाहीत. तेच बनियन घालून फिरत असतात. रोज साले मिक्स वेज आणि काळी डाळ बनवतात. वैताग आला आहे. एका महिन्यात एवढे पराठे खाल्ले आहेत, आता आयुष्यात परत कधी खाणार नाही. सकाळ-सकाळी तेलाने भरलेले पराठे आणि थंडगार दही. बास. याच्या पेक्षा खतरनाक नाश्ता मी कधी केला नाही आणि कधी करणार नाही. डोक्याला शॉट आहे सगळा.
दिवसभर नेटवर टाईम पास करून वेळ घालवण्याचा प्रयत्न चालू असतो. फेस बुक, जी मेल , ई. चा मोठा आधार आहे. ९ तास झोपतो. ११ ते ८. ११ तास प्लांट मध्ये असतो. ९.३० ते ८.३०. काय झंड लाईफ चालू आहे. वरून पोटाचे प्रोब्लेम्स. बास आता. लई झाले.
आयला..लईच!
ReplyDeleteअरे रिलॅक्स हो...ऑफकोर्स सांगणं सोपं आहे..तरीही...
जास्त लिहायचा प्रयत्न कर...फ्रस्ट्रेशन कमी होईल कदाचित...आजूबाजूच्या जागा बघून घे वेळ मिळाला तर...हिमाचल प्रदेश मस्त जागा आहे म्हणतात, पर्यटनासाठी!
एन्जॉय...आणि पोस्ट्स येऊ देत!
शिमल्याला जायचा प्लान बनला आहे. पण च्यायला सुट्टी नाही मिळत आहे. इथून मनाली सुद्धा जवळ आहे.
ReplyDeleteच्यायला फुकट पगार पायजे काय मग तुम्हाला...काम झंड वाटतय तुला, गावात बोम्बलत फिरताना काय लई मोठं झेंड लावत हुतास काय रं .. आणि भाईर कुत्र हाल जहाल्या बिगर घर्च्या भाकरीची गोडी न्हाई कळत...
ReplyDelete:-))
Sardar is at the right place ..
ReplyDeleteMe ase aikle aahe ki North madhe jevan khup chaan milate ..
:)
ReplyDeletePravin kolhapurla ye.
Karvinagara madhe ye u will be get refreshed.
Jagat bhari aaple kolhapur
हा हा हा! बेश्ट!!! अगदी मनापासून लिहिलाय. मला वाटलेलं फक्तं software engineersच असतात :P
ReplyDeleteI'm sure, हा post लिहिल्यावर थोडं बरं वाटलं असेल.
एक suggestion: एक thunderbird विकत घे आणि फिरायला जा.
आणखी एक suggestion: लग्नं कर किंवा पोरगी पटव ;)
@सोम्या: घरच्या भाकरीची गोडी तशीही बाकी कशाला येत नाही. कष्ट करा किंवा बोंबलत फिरा. गावात काय झेंडे लावले हेच्या बद्दल परत कधी लिहीन. :)
ReplyDelete@कपिल: पोस्ट लिहून मस्त वाटले. पण त्याच्यापेक्षा comments वाचून जास्त बरं वाटले. तुझ्या दुसऱ्या suggestion वर ९०% काम झाले आहे. तारीख यथावकाश कळवली जाईल :)